Thursday, July 30, 2009

स्वाइन फ़्लु

नमस्कार,

मागचा महिना अगदिच निवांत गेला. कांचन नागपुरला होती. वेळही भरपुर होता मला, पण का कोण जाणे, आपल्याशी तेवढा सम्पर्क साधु शकलो नाही. असो. कामाचा व्याप पण जरा जास्तच होता. आता जरा निवांत आहे.कांचन परत आली आहे. घरी कामाची गडबड नाही.

सध्या सर्दि,ताप ह्यांचा प्रकोप वाढतोय. अमेरिकेला गेलेली बरीच मंडळी, परत येतान्ना स्वाइन फ़्लु घेवुन आली. पुण्यात 124 लोकं झालीत स्वाइन फ़्लु ची. जरा गांभिर्याने आज हाच विषय घेवुया आपण चर्चेला. स्वाइन फ़्लु लाच एच.१एन१ असेही संबोधतात.

जगातल्या सर्व डुक्करांमधे हा रोग सामान्य आहे. सर्व सामान्य तापात जसा आपल्याला ताप, खोकला येतो, घसा खवखवतो, शरीर दुखतं, डोकं दुखतं आणि थकल्यासारखं वाटतं, तसच काहिसं स्वाइन फ़्लु मधे वाटतं. तरीही आपल्याला खालिल लक्षणे स्वाइन फ़्लु च्या संदर्भात आढळु शकतात.
१. कहिहि खाण्याची इच्छा नसणे. कशातही लक्ष न लागणे.
२. सतत अंग दुखणे.
३. सतत डोळे पाणावणे.
४. मळमळणे आणि उल्टी सारखे वाटणे.
५. पातळ संडास होणे.

ह्या रोगावर उगाच वायफळ चर्चा करण्यापेक्षा, त्वरीत उपाययोजना अमलात आणा.
ह्या रोगावर सध्या कुठलीही औषध मिळत नाही. ह्या संदर्भात शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरु आहेत आणि पुढिल एका वर्षात ह्य रोगाची औषध आपल्याला मिळेल अशी आपेक्षा आपण करुया.

हा रोग होवु नये यासाठी खालिल उपाययोजना कराव्यात.

१. शिंकतान्ना किंवा खोकतांना, नाका तोंडावर टिशु पेपर ठेवा, व एकदा वापरल्यानंतर हा टिशु पेपर फेकुन द्या.
२. शिंकल्यानंतर किंवा खोकल्यानंतर आपले हात स्वच्छ पण्याने व साबणाने धुवा.
३. तुमच्या डोळ्यांना, नाकाला किंवा तोंडाला परत परत हात लावु नका. जंतु ह्याने जास्त लवकर पसरतात.
४. आजारी माणसाच्या जास्त जवळ जावु नका.
५. जर तुम्ही आजारी असाल तर बाहेर पडु नका. घरीच रहा.
६. तुमचा ताप जर १००.५ फ़ॅ. पेक्षा जास्त असेल तर ताबडतोब वैद्याला बोलवा. आणि पेय पदार्थ घ्यायला ताबडतोब सुरुवात करा.
७. आपले हात सतत गरम वाहत्या पाण्यात साबणाने धुत राहा. जर गरम पाणि शक्य नसेल तर अल्कोहोल मिश्रित हात धुण्याचे जेल सुद्धा आपण वापरु शकता.
८. ह्या कळात दुर देशीचा प्रवास टाळलेला बरा. निकटचा प्रवास देखील आपण फ़ार काळजीपुर्वक आखावा.

अश्विन शेंडे

No comments: