Wednesday, August 5, 2009

स्वाइन फ़्लु - माझी एक मदत

नमस्कार,

नुकताच पुण्यात एका चौदा वर्षीय मुलीचा स्वाइन फ़्लु ने मृत्यु झालाय. या विषयाचे गांभिर्य दिवसें दिवस वाढतयं. जर आपण पुण्यात असाल तर खालिल माहिती आपल्या अधिक उपयोगी पडु शकेल हिच मनोकामना.

स्वाइन फ़्लु च्या लक्षणांबाबत आपण मागच्या अंकात माहिती घेतली. आता पुढे...

1.स्वाइन फ़्लु चा काही प्रतिबंधात्मक उपाय आहे का?

जेव्हा एखादि व्यक्ति खोकते किंवा शिंकते तेव्हा वायुद्वारे ह्य रोगाचे जंतु वातावरणात पसरतात. खोकतान्ना किंवा शिंकतान्ना उडालेले जंतु कुठेही बसु शकतात उदा. दाराची पकड, टेबल. जर तुम्ही सार्वजनीक जागेत, अशा वस्तुन्ना हात लावता, आणि त्याच हाताचा स्पर्श आपल्या नाकाला किंवा तोंडाला करता, तेव्हा स्वाइन फ़्लु चा प्रादुर्भाव आपल्याला होवु शकतो. तो आपल्या श्वसन प्रणाली ला धोका पोहोचवु शकतो. हे टाळण्यासाठी खालिल उपाययोजना आपण करु शकता.

१. सार्वनजीक जागेत असलेल्या वस्तुंना हात लावु नका.
२. गर्दि मधे वावरतान्ना, नाकाला व तोंडाला मास्क बांधा.

2.यदाकदाचित जर माझ्यात स्वाइन फ़्लु चि लक्षणं मला आढळलीत तर मी त्या संबंधित चाचणी पुण्यात कुठे करुन घेवु शकतो?

तुम्ही पुण्यात "नायडु हॉस्पिटल" ल जावुन स्वाइन फ़्लु चि चाचणी करुन घेवु शकता.

3.कुठे आहे हे नायडु हॉस्पिटल?

नायडु हॉस्पिटल हे पुणे स्टेशन जवळ आहे, राजा बहादुर मिल ला लागुन. पुणे आर.टी.ओ. कडुन ली मरेडियन ला जातांना, ली मरेडिअयन च्या अगोदरची डावी वळण आपण घ्या आणि दर्शविलेल्या चिन्हांचा उपयोग करुन आपन या इस्पितळात पोहोचु शकता.


4.नायडु इस्पितळात गेल्यावर नक्की काय करायचे त्याची माहीती कृपया द्या.
नायदु इस्पितळात "क्वारंटाइन वार्ड" शोधा. वार्ड नं. ७ मधे ते आपल्याला सापडेल.
तेथे असलेल्या डॉक्टरांना भेटा. ते सर्व प्रक्रिया आपल्याला समजावुन सांगतील. ते ठरवतील की आपल्यावर स्वाइन फ़्लु ची चाचणी करुन घ्यावयाची की नाही.

5.डॉक्टर कोणकोणत्या चाचण्या करतात?
जर डॉक्टर तुमच्यावर चाचणी करणार असतील, तर तुम्हाला एक दिवस क्वारंटाइन वार्ड मधे घालवावा लागेल. तुम्च्या घशातुन किंवा नाकातुन येणाऱ्या लाळेचे नमुना घेतात. हा नमुना नॅशनल इंस्टिट्युट ऑफ वायरोलोजी (एन.आय.व्ही.) ला पाठवितात. एन.आय.व्ही. त्य नमुन्याचं परिक्षन करतं आणि सकाळी ८ च्या अगोदर पाठविलेले नमुने तपास करुन आपल्याला दुपारी ३ पर्यंत निकालासहित कळु शकतात. निकाल हा "सकारात्मक", "नकारात्मक" किंवा "निकाल नाही" अशा स्वरुपात असु शकतो.

निकाल "नकारात्मक" असेल तर आपण घरि जावु शकता.

जर "निकाल नाही" अशी परिस्थिती असेल तर आणखीन एक दिवस आपल्याला क्वारंटाइन वार्ड मधे घालवावा लागतो. ह्यात परत दुसऱ्या दिवशी नमुना चाचणी केली जाते.

जर तुमचा निकाल सकारात्मक असेल तर तुम्हाल पुढची पाच दिवस क्वारंटाइन वार्ड मधे घालवावी लागतात. त्या काळात आपल्याला औषधी दिल्या जातात व डॉक्टर आपल्याला दिवसातुन २ ते ३ वेळा तुम्हाला तपासतात. ह्या उपचारादरम्यान तुमच्या संपुर्ण कुटुंबालासुद्धा रोग प्रतिबंधात्मक औषधे दिली जातात. पाचव्या दिवशी, स्वाइन फ़्लु नकारात्मक आहे हे बघण्यासाठी एक अखेरची चाचणी केली जाते.

6.क्वारंटाइन वार्ड मधे काय काय असतं?
त्यात गेल्यावर तुम्हाला एक बेड आणि एक मास्क देतात. पुर्णवेळ तुम्हाला हा मास्क बांधुन राहावा लागतो. तुम्ही तुमच्या सोबत मोबाइल बाळगु शकता. त्याद्बारे तुम्ही तुमच्या आप्तजनांपर्यंत पोहोचु शकता. तुमच्या कुटुंबातल्यांना तुम्हाला खायला प्यायला घेवुन यायला सांगा. उदा. चहा, कॉफी, दुध, जेवण. पुस्तके, लॅपटोप तुमच्या जवळ असु द्या, मोकळ्या वेळात तुम्हाला त्याची मदत होइल.

तेथे असलेले संडास कॉमन आहेत. गरम पण्याची सोय येथे नाही. तुमच्या कुटुंबातील व्यक्ति तुम्हासं भेटु शकत नाहीत. ते तेथे कामावर असलेल्या मुलाला तुमचा डबा देतील व तो तुम्हाला तो डबा देइल अशी इथली व्यवस्था आहे.

जर तुमचा लहान मुलगा/ मुलगी स्वाइन फ़्लु ने आजारी असेल तर तेव्हा तुम्हि त्यांच्या सोबत क्वारंटाइन वार्ड मधे राहु शकता. तेव्हा तुम्हालाही औषधे घ्यावी लागतील व दिवसभर मास्क बांधुन राहावे लागेल.

(अनुवादित लेख:)

अश्विन शेंडे