Thursday, July 23, 2009

आज जरा जीवनावर लिहायचं म्हणतो...

नमस्कार मंडळी,

बर्याच दिवसांपासुन ब्लॉग लिहायला वेळच मिळाला नाही. पण रोज ऑफ़िस ला येता जाता काहि काहि विषय डोक्यात यायचे, ह्यावर लिहु कि त्यावर लिहु. ह्याचाच अर्थ असा कि मि तुम्हाला दुरावलो नव्ह्तो, पण बायको घरी नसल्यामुळे घर, ऑफ़िस, समाजिक जबाबदारी, मित्र, छंद यातुन वेळ काढणं जरा जड जात होतं. आज ऑफ़िसच काम संपवलं आणि लिहायला बसलो.

आज जरा जीवनावर लिहायच म्हणतो. म्हणजे हा विषय माझा आवडता पण आहे. जीवनाकडे फ़ार डोळस पणे बघणारा मी. मी मीच का? हा प्रश्न मी कित्येक वर्ष मनात जोपासला आहे. देव सगळ्यांना वेगवेगळे घडवितो. वेगळे विचार, आचार, गुण इत्यादि. प्रत्येक जण वेगळा वागणार, बोलणार, खणार, पीणार इत्यादि. मग जर असं असेल तर मी हा लेख क लिहितोय? वागु द्या ना ज्याला जसं वागायचं तसं. आपण का कुणाच्या अध्यात - मध्यात करावं? का कुणाकडुन आपण आपल्यासारखी वागण्याची अपेक्षा करावी? खरचं समजातली माणसं एकसारखी वागु शकतात का? असं होणं शक्य आहे का? .............................................

उत्तर कदचित "नाही" असा असेल ह्या प्रश्नाचं. पण आपण एक "शिष्टाचार" नावाचा प्रकार लहानपणी शिकलोय. शाळेतलं जरी तुम्हाला आठवत नसेल तर आई बाबांनी दिलेला चोप व त्याची कारणे ह्याची जरी तुम्ही कारणमीमांसा केलीत तरी तुमच्या ध्यानात येइल की हे सर्व एका विशिष्ठ कारणांसाठी हे सगळं केलं जातं.

तर समाजात, कुटुंबात वावरतन्ना आपण ह्या शिष्टाचाराच्या अधिपत्याखालि असणं अपेक्षीत आहे, कारण आपण आपल्या वागणुकीतुन जो संदेश दुसऱ्यापर्यंत पोहोचवितो, तो दुसऱ्यांना सुखावु किंवा दुखावु शकतो. व त्यातुन तुम्हाला समाजात मान्यता मिळत असते.

तर कधितरी (दररोज झोपतांना केले तर उत्तम) प्रत्येकाने स्वत:ला खालील प्रश्न विचारले पाहीजेत व स्वत:कडे डोळसपणे बघून त्या प्रश्नांची उत्तरे शोधली पाहीजे.

- मी आज जे वागले\वागलो ते बरोबर आहे का?
- मी आज जे बोल्ले\बोल्लो ते बरोबर आहे का?
- माझ्यात शिष्टाचार किती होता आजच्या वागण्यात?
- सभोवतालच्या वातावरणातुन मला प्रेम मिळावं यासाठी मी काय काय करायला हवं?
- माझ्या अवती-भवती असं कुणी आहे का जो\जी माझ्यासाठी एक आदर्श म्हणुन, मला उपयोगी पडेल?
- खरच शिष्टाचाराचा अवलंब करणारे लोक जीवनात काही मीळवतात की नाहि?
- माझे व्यक्तिमत्व तसेच ठेवुन मी थोडं शिष्टाचाराचं पॉलिश लावुन घेतलं तर माझे जीवन कीती सुखी होवु शकेल?
- ह्याने घडुन आलेला बदल माझ्या सभोवतालच्या वातावरणातुन मी अनुभवु शकेन का?

अश्विन शेंडे