Thursday, May 28, 2009

"माझी स्प्लेन्डरवारी"

"पाऊले चालली पंढरीची वाट, सुखी संसाराची मोडुनिया कात", संसाराची कात घरीच टाकुन रोज सकाळी मी ऑफ़िस ला निघतो, प्रवास लांब, एक गावाहुन दुसऱ्या गावाचा, थेट २७कीमी चा, पन गेल्या १३ महिन्यांपासुन मी रोज हा प्रवास करतोय. मनाचा एक कप्पा रोज हिणवायचा मला, रोज रूसायचा, हल्ले करायचा माझ्यावर...अरे रोज काय २ तासांचा प्रवास....मी ही चिड्लो होतो खुप, वाटलं नको हा प्रवास, नको हा रहदारीचा भस्मासुर रोज बघायला.......पण नियतीपुढ़े माझे काहीही चाल्ले नाहि......मी माझी स्प्लेन्डरवारी करत राहीलो....


धायरी ते हिंजेवडि ह प्रवास तसा २०कीमी चा. ८० ट्क्के प्रवास हा राष्ट्रीय महामार्गावरचा. एकदा धायरी पुलावरुन महामार्गाला लागलो की थेट, चांद्नी चौक पार करत हींजेवडी. मधे कुथेही सिग्नल नाही कि अडथळा नाही. वाटेत येणाऱ्या खट्याळ वाऱ्याशी झुंजत, हेल्मेट च्या म्रुदु आवरणातुन डोळे कीलकिले करत, ओवरटेक करताना, मागच्या वाहनांचा कानोसा घेत, निसर्गरम्य, मदहोश वातावरणाला शीळ घालत.. मी थेट पोहोचतो माझ्या ऑफ़िस ला.

वाट लागते ती धायरीतुन निघुन हायवे ला लागताना आणि हिन्जेवाडी चौकातुन, आत ऑफ़िस ला जातांना. वैताग करण्याची पायरी मी कधीच उलटलेली. त्यामुळे मख्ख चेहऱ्याने मी डांगे चौकातील रहदारी ओलांडतो व कसाबसा ऑफ़िस दर्शन घड्वुन घेतो. हे अथक परिश्रम करायला मला ७५ मिनीटे लागतात.

अशी ही साठा उत्तराची स्प्लेन्डरवारी मी आता संपवतोय.

अश्विन शेंडे

Thursday, May 21, 2009

नमस्कार, मी आपल्या सेवेत एका नव्या वेशात सादर होत आहे.

नमस्कार, मी आपल्या सेवेत एका नव्या वेशात सादर होत आहे. मराठित लिहायला सुरुवात कर्तोय. आपला आशिर्वाद सदैव मिलत राहो हिच सदिच्छा.