Tuesday, June 2, 2009

जेव्हा मला विंचु चावला......

जेव्हा मला विंचु चावला......


गोष्ट फ़ार जुनी आहे, माझ्या बालपणीची, मी पाचवीत होतो, आम्ही नुकतेच आमच्या नविन घरात बिऱ्हाड हलवलं होतं, ४ ते ५ महिने झाले असतील कदाचित, पुर्वीच्या शेतीच्या जमिनीवर आमचे घर असल्यामुळे, किड्य़ा किटकुलांचा फ़ार त्रास व्हायचा आम्हाला.......एकदा तशाच दिवसात, एकदा विहिरीवर आंघोळ करतान्ना माझ्या पायावर एक गोगलगाय चिपकलेली होती आणि मी मोठ्ठयाने किंचाळलो होतो........नंतर एवढ्याश्या गोगलगाई ला घाबरतोस म्हणुन आइचे धपाटे खाल्ले होते.....

असो....तर मी आपल्या मुद्द्यावर येतो.....ते साल होते १९८८ चे, आमचे दत्तवाडी, नागपुर चे घर हे खुप मोठे आहे......एकदा गुढिपाडव्याच्या दिवशी मला सुट्टि होती.....सकाळ १०.३० च्या सुमारास मी आपला आई भोवति घुटमळत होतो......आई स्वयंपाक घरात, ओट्याजवळ पोळ्या करीत होती.....मी जवळच जमिनीवर बसलो होतो आणि तेथे असलेल्या भांड्य़ांच्या मांड्णी जवळ माझे लक्ष गेले.....मी त्यातली कढई उचलली आणि ती खाली माझ्या जवळ घेतली....जवळच दार होते मागच्या खोलिचे, आणि आई ने सवयी नुसार हात पुसायचा रुमाल तेथे अडकवला होता......कढई ओली असल्यामुळे मला वाटले की ती पुसुन घ्यावी म्हणुन मी हात उंचावुन तो दाराच्या पकडीला लावलेला रुमाल काढुन घेतला आणि ती कढई बाळबोधपणे पुसायला लागलो.....तेवढ्यात मला आईचा आवाज आला....ती मला बोल्ली कि आज गोड काय करायचे....माझे कढई पुसने चालुच होते व मी काय गोड खायचे ते ठरवत होतो........मला खीर आवडते......मी तिला सांगणार एवढ्यात मला त्या रुमलातुन माझ्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाला काहितरी टोचल्याचा भास झाला......मे पटकन हात मागे ओढुन घेतला.......व बोटाकडे बघितले.....काहिच नव्हते......परत कढई पुसू लागलो.....पण कुणास ठावुक अचानक त्या बोटाला दुखु लागले......मी ओरडलो.......आई........आई घाबरली...माझ्याजवळ आली.......तेवढ्या वेळात माझे दुखणे कमालीचे वाढले आणि तेही क्षणार्धात...आता वेद्नेने व्याकुळ होऊन मी कापड आणि कढई तिथेच सोडुन आंगणात धावत सुटलो.....मोठ्य़ाने ओरडायला लागलो.....आणि मला वेद्ना आवरेना म्हणुन सोबत मोठ्य़ा मोठ्य़ाने उड्य़ा ही मारायला लगलो.......डोळ्यांसमोर अंधार आला होता....पण काही सुचत नव्ह्ते................आई माझ्या मागे मागे घाबरत आली होती आणि माझे असे वागणे पाहुन तिला काहिहि सुचे ना झालय काय ते?...मी तर.......माझ्या विश्वात..............तेवढ्यात आमच्या घराच्या बाजुला असलेल्या घराचे बांधकाम सुरु होते.....तिथली माणसे धाऊन आलीत.......आणि आईला विचारायला लागली......आईला कहिहि सुचेना......नंतर तिच्या लक्षात आले.......ती स्वयंपाक घरात धावलि आणि ती कढई आणि त्यात असलेला तो रुमाल बाहेर घेऊन आलि....तो पर्यन्त माझा एक सतिश दादा तेथे आला होता.........त्याने तो रुमाल उघडुन पाहिला तर त्याला एक भला मोठा विंचु लपुन बसलेला दिसला..........आत्ता सर्वान्ना कळाले...

अंगणातल्या गर्दितुन एक बांधकाम करणारा कामगार पुढे आला..त्याने लाल शर्ट घातला होता.....तेवढे मला दिसले........तो आईला बोल्ला त्याच्या दंडावर एक कापड घट्ट आवळा......आई ने लगेच माझ्या उजव्या हाताच्या दंडाला घट्ट कापड आवळुन बांधले.... त्या माणसाने मला धरले आणि माझे विंचु चावलेले बोट आपल्या तोंडाजवळ धरुन त्यावर फुंकर घालु लागला....मी शांत होऊ लागलो....तो आता बडबडु लागला......काहीतरी पुटपुटु लागला...मंत्र ऊच्चारल्यासारखा.......माझे दुखने कमी होत गेले..मी उड्य़ा मारायचो थांबलो.....शांत झालो......सतिश दादा ने......त्या रुमालातुन निघालेल्या विंचुरायाला दगडाने ठेचुन ठार केले ज्यामुळे त्याला नंतर त्याच्या आईने फ़ार रागावले होते....

नंतरचे सात दिवस मी आमच्या एक ओळखिच्या काळे काकुंकडुन औषध आणि मंत्रोच्चार, माझ्या दुखत्या बोटांवर लावुन घेतले आणि माझे दुखणे पुर्णपणे बंद झाले....पण दंश झाल्या नंतरच्या तीव्र वेदना मात्र मी कधिहि विसरु शकलो नाहि......आता विंचु टी.व्ही. वर जरी पहिला तरी घाबरायला होतं मला.....मात्र प्रसंग माझ्या नेहमीच लक्षात रहिला....तो लाल शर्ट घातलेला माणुस मात्र मला नंतर कधिहि दिसला नाही......सतिश दादा ने त्याची आई रागावल्यमुळे नंतर कुणालही ठेचुन न मारण्याची शप्पथ घेतली.........

अश्विन शेंडे